मुंबई : काल रात्री साडे अकराच्या सुमारास मालाड परिसरातल्या एका बुटाच्या शोरुमखाली असणाऱ्या गोडाऊनला आग लागली. ही आग आटोक्यात आली असली तरी अद्याप या शोरूममधून धुराचे लोळ उठत आहेत. दरम्यान, आगीमुळे वाहतूक कोंडी झाली.
मालाड स्टेशनला येणाऱ्या मुख्य रस्त्यावरच ही घटना घडल्यामुळे तिथं वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झालाय. या आगीत जीवित हानी झालेली नसली, तर लाखो रुपयांची माल जळून खाक झालाय. गोडाऊनमधून रात्री १०च्या सुमारास धूर येत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं.
८ फायर इंजिन आणि ६ पाण्याचे टँकर यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. पण गोडाऊनमध्ये ज्वालाग्राही चामड्याचे बूट असल्यानं आज विझवण्यासाठी तब्बल सहा तास प्रयत्न करावे लागले. शॉर्ट सर्कीटमुळेच ही आग लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.
व्हिडिओ पाहा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.