मुलीला अश्लील एसएमएस पाठवणाऱ्या शिक्षकाला अटक

गुरु शिष्य नात्याला काळीमा फासणारी घटना घाटकोपरच्या 'द युनिव्हर्सल स्कूल'मध्ये घडलीय.

Updated: Nov 11, 2016, 03:59 PM IST
मुलीला अश्लील एसएमएस पाठवणाऱ्या शिक्षकाला अटक title=

मुंबई : गुरु शिष्य नात्याला काळीमा फासणारी घटना घाटकोपरच्या 'द युनिव्हर्सल स्कूल'मध्ये घडलीय.

विद्यार्थिनीला अश्लील एसएमएस पाठवणाऱ्या गणिताच्या शिक्षकाला अटक करण्यात आलीय. पराग शहा असे या शिक्षकाचे नाव आहे. 

गेल्या वर्षभरापासून हा शिक्षक या विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवत होता. तिने या शिक्षकाला खडसावलेही होते. 

मात्र, याचा राग मनात धरुन या नराधम शिक्षकाने मुलीच्या पेपरमध्ये खाडाखोड केल्याचे रिचेकिंगमध्ये आढळले. शाळा प्रशासनाने या शिक्षकाविरोधात कोणतीही कारवाई न केल्याने विद्यार्थिनीच्या पालकांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली.

त्यानंतर पोलिसांचे विशेष पथक नेमून पंतनगर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केलीय. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाळेवर कारवाई करण्यात यावी आणि शाळेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांकडून होतेय.