त्या धुरामुळे मोडलं तरुणाचं लग्न

कल्याणच्या डंपिंग ग्राऊंडला वारंवार लागणा-या आगीमुळे इथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.

Updated: Jun 12, 2016, 04:00 PM IST
त्या धुरामुळे मोडलं तरुणाचं लग्न title=

कल्याण : कल्याणच्या डंपिंग ग्राऊंडला वारंवार लागणा-या आगीमुळे इथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. या आगीचा सर्वात जास्त फटका बसलाय इथं रहाणा-या अमोल जोशी नावाच्या तरुणाला.

डंपींगग्राऊंडला लागणा-या आगीमुळे आणि त्यामुळे निर्माण होणा-या धुरामुळे अमोलचं ठरलेलं लग्न मोडलं आहे. अमोलला लग्नासाठी सांगून आलेल्या मुलीनं लग्नासाठी एक अट घातली ती म्हणजे इथून दुसरीकडे घर घेण्याची. या विचित्र अटीनं या भागातले अमोल सारखे तरुण चक्रावून गेले आहेत.