मुंबई : मुंबई आणि उपनगरात सुमारे ११०० घरांची म्हाडा लॉटरी येत्या ३१ मे ला काढली जाणार आहे.
तर कोकण परिमंडळाची विरार वसई आणि पुणे, नाशिक येथील सुमारे साडेचार हजार घरांची लॉटरी फेब्रुवारी महिन्यात काढली जाणार आहे.
मुंबईकरांसाठी मुलुंड, गोरेगाव, दहिसर, मालाड या भागात लॉटरीसाठी ही घरे असतील,
तर विरार, पुणे, औरंगाबाद, नाशिक येथे साधारण साडेचार हजार पेक्षा जास्त घराची लॉटरी काढली जाईल, अशी माहिती म्हाडा उपाध्यक्ष संभाजी झेंडे यांनी दिली.