www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत आता आणखी एका उड्डाणपूलाची मिलन उड्डाणपुलाच्या निमित्ताने भर पडणार आहे. मिलन उड्डाणपूल अनेक बाजूंनी महत्त्वाचा आहे.
सतत मोठा पाऊस झाला तर मिलन सब-वेमध्ये पाणी साचत तो वाहतूकीसाठी बंद केला जातो. तेव्हा या सब-वेला पर्याय म्हणून पश्चिम रेल्वे मार्गावरुन हा 700 मीटर लांबीचा, 4 लेनचा उड्डाणपूल बांधण्यात आलाय. त्यामुळे एसव्ही रोड आणि पश्चिम द्रुतगतीमार्गवरची वाहतूक पावसाळ्यातही अखंड सुरु रहाणार आहे. उत्तर मुंबईतून सांताक्रुझ, जुहू, विलेपार्ले परिसरात जाण्यासाठी एक जलद मार्ग उपलब्ध होणार आहे.
2009च्या जानेवारीमध्ये या उड्डाणपूलाचे काम सुरु झाले. डिसेंबर 2011 मध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र तीन डेडलाईन पार करत दीड वर्ष विलंबाने हा उड्डाणपूल सुरु होत आहे. विलंबामुळे या प्रकल्पाची किंमत 83 कोटीपर्यंत पोहचली आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.