दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: हल्दीरामच्या सर्व खाद्य पदार्थांची चौकशी करण्यात येणार आहेत. राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
अमेरिकेत हल्दीरामच्या खाद्य पदार्थांमध्ये विषाणू आढळून आले आहेत. त्यामुळं हल्दीरामच्या सर्व उत्पादनांवर अमेरिकेत बंदी घालण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातही हल्दीरामच्या सर्व उत्पादनांची चौकशी करण्यात येणार आहे. मॅगी पाठोपाठ आता हल्दीरामवरही बंदीची संक्रांत कोसळणार की काय असा सवाल उपस्थित होतोय.
अन्नसुरक्षा कायद्यातील तरतुदीप्रमाणे प्रत्येक वेळी नव्या डब्यात पॅक करुन खाद्यपदार्थांची विक्री करणं बंधनकारक आहे. मात्र राज्यात रिपॅकिंग म्हणजेच जुन्याच डब्यात भरुन पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. जनतेच्या आरोग्यशी खेळण्याचा प्रकार होत असल्यामुळं या संदर्भातील चौकशी करण्याचे निर्देशही राज्यमंत्री विद्या ठाकुर यांनी दिले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.