शरीरसंबंध नाकारल्याने मित्राच्या पत्नीचा खून

Updated: May 15, 2017, 10:25 AM IST
शरीरसंबंध नाकारल्याने मित्राच्या पत्नीचा खून title=

 

मुंबई : मित्राच्या पत्नीने शरीरसंबंध नाकारल्याने तिचा गळा चिरून हत्या करणाऱ्या नरधमाला कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे. हितेश कर्तकपाडी
असे त्याचे नाव असून श्वेता महेंद्र तांडेल हिचा त्याने बुधवारी खून केला होता. त्यानंतर अज्ञात लोकांनी घरात घुसून तिची हत्या केल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता असे उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले.

महेंद्र तांडेल हा पत्नीबरोबर सुंदरनगरात राहायला होता. त्याच्या घराच्या वरच्य खोलीत हिेतेश आणि अजून दोघे जण राहत होते. चौघे जण सेल्समनचे काम करतात. बुधवारी महेंद्र आणि अजून दोघे कामावर गेल्यानंतर हितेश तिथेच थांबला होता. त्याने श्वेताकडे शरीरसंबंधाची मागणी केली. तिने नकार दिल्याने तेव्हा मात्र तो तिच्यावर जबरदस्ती करू लागला. त्यावेळेस ती जमिनीवर पडल्याने तिच्या डोक्याला मार लागला.
जखमी झाल्याने ती आपल्याविरूद्ध तक्रार करेल या भीतीने हितेशने स्वयंपाक घराच्या खोलीत असलेल्या चाकूने तिचा गळा कापला. ती ठार झाल्यानंतर हितेश काही न बोलता कामाच्या ठिकाणी गेला.

घरातून खाली उतरत असताना खोलीमध्ये काही लोक गेले होते. ते तिच्या परिचयाचे असतील म्हणून आपण विचारपूस न करता कामावर निघून गेलो असे हितेशने पोलिसांना सांगितल होते. मात्र त्याच्या जबाबातील विसंगती असल्याने 'खाक्या' दाखविल्यावर त्याने खुनाची कबुली दिली. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.