आमदार श्रीकांत देशपांडे वाढीव पगार नाकारला

विधान परिषदेचे सदस्य श्रीकांत देशपांडे यांनी वाढीव आमदार पगार नाकारलाय. विनाअनुदानित शिक्षकांच्या पगाराची समस्या आहे.. त्यात आर्थिक भार नको अशी भूमिका देशपांडे यांनी घेतलीय.

Updated: Aug 8, 2016, 05:09 PM IST
आमदार श्रीकांत देशपांडे वाढीव पगार नाकारला  title=

मुंबई : विधान परिषदेचे सदस्य श्रीकांत देशपांडे यांनी वाढीव आमदार पगार नाकारलाय. विनाअनुदानित शिक्षकांच्या पगाराची समस्या आहे.. त्यात आर्थिक भार नको अशी भूमिका देशपांडे यांनी घेतलीय.

 याबाबतचं पत्र त्यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांना दिलंय.. महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषद आमदारांच्या वेतनामध्ये दुपटीनं वाढ करण्यात येणाराय.  
 
 आमदारांचं वेतन 75 हजारावरून आता दीड लाख रूपये होणाराय... मात्र देशपांडे यांनी हा वाढीव पगार नाकारलाय.. आता देशपांडे यांचा आदर्श इतरही आमदार घेणार का हा प्रश्न आहे.. तर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही पगारवाढीला विरोध करत, वाढीव पगार घ्यायला नकार दिलाय.