मनसे नगरसेविकेला 15 हजारांची लाच घेताना अटक

माहीममधील मनसेची नगरसेविका श्रद्धा पाटील आणि तिचे पती राजेश पाटील यांना 15 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली.

Updated: Aug 22, 2014, 06:26 PM IST
मनसे नगरसेविकेला 15 हजारांची लाच घेताना अटक title=

मुंबई : माहीममधील मनसेची नगरसेविका श्रद्धा पाटील आणि तिचे पती राजेश पाटील यांना 15 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली.

एका स्वयंसेवी संस्थेकडून १५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी पाटील दांपत्याला रंगेहाथ पकडले.‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानां’तर्गत बेरोजगारांसाठी कार्यरत असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेला वॉर्ड क्रमांक १८१ मधील नयानगर आणि गढ झोपडपट्टीमधील स्वच्छतेचे कंत्राट मिळाले. दरमहिना दहा हजार द्या नाहीतर तुमचे कंत्राटच रद्द करतो, अशी धमकी राजेश पाटील यांनी या संस्थेच्या कार्यकर्त्यांना दिली, असे तक्राराचे म्हणणे आहे.

ही संस्था साफसफाईचे काम नीट करत नसल्याची तक्रारही श्रद्धा पाटील हिने पालिकेत केली. श्रद्धा आणि राजेश पाटील यांनी पैशांसाठी तगादा लावल्याने संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांकडे तक्रार केली. अधिकार्‍यांनी लावलेल्या सापळ्यात पाटील दांपत्य १५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडले. 

गुन्हा दाखल करून श्रद्धा पाटील यांनाही अटक करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.