धैर्यकन्या मोनिका मोरेला बारावीच्या परीक्षेत फर्स्टक्लास

रेल्वेच्या अपघातात दोन्ही हात गमावणारी मोनिका मोरे बारावीच्या परीक्षेत पास झाली आहे, मोनिका मोरे ही फर्स्ट क्लासने पास झाल्याचं सांगण्यात येत आहे. मोनिका मोरेने 63 टक्के गुण मिळवले आहेत.

Updated: May 27, 2015, 04:39 PM IST
धैर्यकन्या मोनिका मोरेला बारावीच्या परीक्षेत फर्स्टक्लास title=

मुंबई : रेल्वेच्या अपघातात दोन्ही हात गमावणारी मोनिका मोरे बारावीच्या परीक्षेत पास झाली आहे, मोनिका मोरे ही फर्स्ट क्लासने पास झाल्याचं सांगण्यात येत आहे. मोनिका मोरेने 63 टक्के गुण मिळवले आहेत.

बारावीच्या वर्षात मोनिका मोरे हिच्यावर हात गमावण्याची वेळ आली होती, तेव्हा मोनिका मोरेने या परिस्थितीचा अतिशय धैर्याने सामना केला.

मोनिकावर अनेक दिवस उपचार सुरू होते, या दरम्यान तिला कृत्रिम हात बसण्यात आले होते. मोनिका मोरेने तरीही बारावी परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.