मुंबई सेंट्रल टर्मिनसवर गूगलमार्फत मोफत वायफाय सेवा?

भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रवाशांना मोफत वायफाय सुविधा देण्याचा मानस व्यक्त करण्यात आलाय. गूगलमार्फत मुंबईत ही सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई सेंट्रल टर्मिनसवर प्रथम सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी), लोकमान्य टिळक टर्निनस (एलटीटी) या स्टेशनवर वायफाय सुविधा असेल.

PTI | Updated: Sep 29, 2015, 06:30 PM IST
मुंबई सेंट्रल टर्मिनसवर गूगलमार्फत मोफत वायफाय सेवा? title=

मुंबई : भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रवाशांना मोफत वायफाय सुविधा देण्याचा मानस व्यक्त करण्यात आलाय. गूगलमार्फत मुंबईत ही सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई सेंट्रल टर्मिनसवर प्रथम सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी), लोकमान्य टिळक टर्निनस (एलटीटी) या स्टेशनवर वायफाय सुविधा असेल.

देशातील ५०० स्टेशन्सवर गूगलच्या साहाय्याने वायफाय सेवा देण्यात येणार आहे. यात वायफाय सेवेचा पहिला मान मुंबई सेंट्रल टर्मिनसला मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत वायफाय सेवा मुंबई सेंट्रल टर्मिनसवर उपलब्ध होईल, असे संकेत पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेत.

अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅलिफॉर्नियातील गूगलच्या मुख्यालयाला भेट दिली; तसेच गुगलचे नवे सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी चर्चाही केली. यात मोदींच्या डिजिटल इंडियाच्या योजनेनुसार भारतात ५०० स्थानकांवर उच्च दर्जाची वायफाय सेवा सुरू करणार असल्याची घोषणा पिचाई यांनी केली.

सर्वांत व्यस्त अशा रेल्वेच्या १०० स्थानकांवर पुढील वर्षापर्यंत वायफाय सेवा सुरू होईल, असेही ते म्हणाले. मुंबईत वायफाय सुविधा नोव्हेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत येईल आणि ती उच्च दर्जाची असेल. पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल टर्मिनसला हा मान आहे.

दरम्यान, सीएसटी स्टेशनवरर सध्या वायफायची चाचणी सुरू असून, त्याचबरोबर दादर, एलटीटी, ठाणे आणि पुणे टर्मिनसवरही गूगलच्या साहाय्याने वायफाय सुविधा देणार येणार असल्याचे सांगण्यात आलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.