मुंबईत मेट्रो उद्यापासून धावणार, अधिकृत घोषणा

मुंबईत मेट्रो ट्रेन उद्यापासून धावणार आहे. मुंबई मेट्रोचे सीईओ अभय मिश्रा यांनी याबाबत आज अधिकृत घोषणा केलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 7, 2014, 02:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत मेट्रो ट्रेन उद्यापासून धावणार आहे. मुंबई मेट्रोचे सीईओ अभय मिश्रा यांनी याबाबत आज अधिकृत घोषणा केलीय.
दरम्यान, आजच नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनाही यासंदर्भात माहिती दिली होती. मेट्रोचे दर कमी करण्यासाठीही सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलंय.
घाटकोपर-वर्सोवा मेट्रो रेल्वे उद्या सुरु होण्याचा मार्ग मोकळा झालाय. कारण रेल्वे बोर्डाच्या शेवटच्या प्रमाणपत्रानंतर आता राज्य सरकारनंही मेट्रोला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळं मेट्रो कोणत्याही क्षणी सुरु होण्याची शक्यता आहे.

मात्र दर पत्रकावरुन राज्यसरकार आणि रिलायन्समध्ये जो घोळ निर्माण झाला होता आता तो ही दूर होण्याची शक्यता आहे. सरकारनं 9 ते 13 रुपया दरम्यान दर ठरवला आहे. पण रिलायन्सनं दरपत्रकात परस्पर फेरबदल करत 10 ते 40 पर्यंत दर जाहीर केला आहे. त्यामुळं आता दर कमीत कमी ठेवून मेट्रो सुरू करणार असल्याचं नगरविकास राज्यमंत्री उदय सामंतांनी सांगितलंय.

त्याचबरोबर मेट्रोच्या श्रेयावरुनही राजकारण सुरु झालं आहे. भाजपा खासदार किरीट सोमय्यांनी मेट्रोचं उद्घाटन करणार असल्याचं जाहीर करताच सरकारनं उद्घाटनावर बंदी घातली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.