www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई पोलीस आयुक्तपदी विजय कांबळे यांची निवड निश्चित असून आज दुपारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार असल्याची माहिती झी मीडियाच्या सूत्रांनी दिलीय. सत्यपाल सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्तपद गेल्या १२ दिवसांपासून रिक्त आहे.
धनंजय जाधव यांच्यानंतर पहिल्यांदाच मुंबईला मराठी पोलीस आयुक्त मिळणार असून विजय कांबळे यांनी क़ायदा सुव्यवस्था पोलीस महासंचालक जावेद अहमद, ठाणे पोलीस आयुक्त के पी रघुवंशी आणि एटीएसचे प्रमुख राकेश मारीया यांना मागे टाकून मुंबई पोलीस आयुक्त पद पटकावल्याची माहिती मिळत आहे.
विजय कांबळे, के पी रघुवंशी आणि अहमद जावेद हे तिघं १९८० बॅचचे आयपीएस अधिकारी असून राकेश मारिया हे १९८१ बॅचचे अधिकारी आहेत. गेली बारा दिवस चाललेल्या नियुक्ती नाट्याचा शेवट करण्यासाठी अहमद जावेद आणि के पी रघुवंशी यांना पोलीस महासंचालक पदावर बढती, तर राकेश मारिया यांची ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.