मुंबई : पोलीस, लष्कराचे जवान समाजाच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटत असतात त्याचप्रमाणे त्यांचे श्वानही नागरिक सुरक्षित राहावेत म्हणून सदैव तत्पर असतात. मात्र कालांतरानं माणसांप्रमाणेच या श्वानांनाही निवृत्ती दिली जाते. असाच एक कौतुकास्पद सोहळा मुंबईत झाला.
परळमधल्या पशुवैद्यक महाविद्यालायतला हा कार्यक्रम आहे जीवनगौरव पुरस्कारांचा. आणि या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती होते ते पोलीस दलातले विविध श्वान.
शॉटगन, नॉटी, सीमा, आणि एन्जल हे पोलीस श्वान नुकतेच निवृत्त झाले. 26/11 सह इतर अनेक आपत्कालीन परिस्थितीत या आणि इतरही श्वानांची कामगिरी उल्लेखनीय राहिली होती. पोलीस दलाची शान असलेल्या या श्वानांची निवृत्तीनंतरही विशेष काळजी घेतली जाते.
आदेशानुसार तंतोतंत काम करणं ही या श्वानांची खासियत. एक इशारा आणि कामगिरी फत्ते झालीच, हे या श्वानांचं वैशिष्ट्य.
आजपर्यंत तुम्ही माणसांनी माणसाविषयीच्या कार्याबद्दलचे पुरस्कार सोहळे अनेक पाहिले असतील ऐकलेही असतील. हा ही तसाच आहे. पण दोन पायांवर चालणा-या माणसांऐवजी चार पायांवर चालणा-या श्वांनांच्या कर्तुत्वाचा होता. खरच हा कौतुकास्पद सोहळा असचं म्हणावं लागेल.