इंटरेस्टिंग : विजय माल्यांची ५० फुटी होळी पेटली...

 मुंबईत होळीत कल्पकतेला किंवा करंट अफेअर्सला खूप महत्त्व दिले जाते. कधी मुंबईत कसाबला जाळलं जातं तर कधी दहशतवाद्यांची होळी केली जाते. 

Updated: Mar 24, 2016, 09:23 PM IST
इंटरेस्टिंग :  विजय माल्यांची ५० फुटी होळी पेटली... title=

मुंबई :  मुंबईत होळीत कल्पकतेला किंवा करंट अफेअर्सला खूप महत्त्व दिले जाते. कधी मुंबईत कसाबला जाळलं जातं तर कधी दहशतवाद्यांची होळी केली जाते. 

यंदा भारतीय बँकांना चुना लावून परदेशात पळालेल्या विजय माल्या यांची ५० फुटांची होळी मुंबईतील बीडीडी चाळीत करण्यात आली होती. 

असत्यावर सत्याचा 'विजय' मिळविण्याचे प्रतिक म्हणून होळी चाळण्याची परंपरा आहे.  भारतीय बँकांना फसवून गेलेल्या माल्याविषयी सामन्यांनी दिलेली ही तीव्र प्रतिक्रिया आहे.