मुंबई विद्यापीठाचा फी वाढीचा निर्णय

कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी. मुंबईतल्या सर्व कॉलेजमध्ये फी वाढ होणार आहे. 

Updated: Apr 18, 2017, 06:04 PM IST
मुंबई विद्यापीठाचा फी वाढीचा निर्णय title=

मुंबई : कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी. मुंबईतल्या सर्व कॉलेजमध्ये फी वाढ होणार आहे. 

मुंबई विद्यापीठात परीक्षा फी वाढीची निर्णय घेण्यात आलाय. ६५० वरुन १२०० रुपये अशी ही फी वाढ करण्यात आलीय. 

या विद्यापीठाअंतर्गत येणा-या ७५० कॉलेजमध्ये फी वाढ होणारय. मुंबई, रायगड, रत्नागिरीच्या कॉलेजांचा समावेश यात करण्यात आलाय.