मुंबईकरांना आज त्यांच्या डब्यांबरोबर मिळाली एक चिठ्ठी

 मुंबईकरांना आज त्यांच्या डब्यांबरोबर एक चिठ्ठी मिळाली.डबा उघडताच सापडलेल्या या चिठ्ठीमध्ये एक संदेश लिहीला होता.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 20, 2017, 07:11 PM IST
मुंबईकरांना आज त्यांच्या डब्यांबरोबर मिळाली एक चिठ्ठी  title=

मुंबई : मुंबईकरांना आज त्यांच्या डब्यांबरोबर एक चिठ्ठी मिळाली.डबा उघडताच सापडलेल्या या चिठ्ठीमध्ये एक संदेश लिहीला होता. आणि अर्थातच हा संदेश होता मतदान करा.

 मुंबईतली मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आज मुंबईतल्या डब्बेवाल्यांनी ही मोहीम राबवली. त्यामध्ये त्यांनी मुंबईकरांना त्यांच्या डब्ब्याबरोबर चिठ्ठी लिहीली आणि मतदान करण्याचं आवाहन केलं. 

झी मीडियानेही मतदारांना मतदानात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे, मुंबईच्या काही भागात मतदानाचा टक्का फार कमी आहे.