प्रवीण नलावडे, मुंबई : गीतेमध्ये जीवनाचं सार सामावलेलं आहे, असं हिंदू धर्मीय मानतात. मात्र गीतेचं तत्वज्ञान विशिष्ट धर्मापुरतं मर्यादित नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. इस्कॉन वतीनं अलिकडच गीतेवर आधारित 'गीता चॅम्पियन्स लीग' अशी लेखी स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. या परीक्षेत मीरारोडला राहणा-या एका 12 वर्षीय मुस्लिम मुलीनं चक्क पहिला नंबर पटकावला.
मरियम सिद्दीकी असं तिचं नाव असून, ती कॉस्मॉपोलिटन हायस्कूलमध्ये सहाव्या इयत्तेत शिकते. तब्बल चार ते पाच हजार परीक्षांमधून ती पहिली आलीय. विशेष म्हणजे ती मुस्लिम धर्मीय असतानाही तिच्या आईवडिलांनी तिला 100 गुणांच्या या परीक्षेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. एवढंच नव्हे तर भगवतगीतेचा अभ्यासही त्यांनी करवून घेतला.
भगवद्गीतेचं तत्वज्ञान विशिष्ट धर्मापुरतं मर्यादित नाही... याचा प्रत्यय पुन्हा आणून दिला तो एका 12 वर्षांच्या मुस्लिम मुलीनं... गीतेवर आधारित 'गीता चॅम्पियन्स लीग' नावाच्या लेखी स्पर्धेत या मुस्लिम मुलीनं चक्क पहिला नंबर पटकावलाय...
ये पेड ये पत्ते ये शाखे भी परेशान हो जाए, अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो...
धर्माच्या नावावर भेदाभेद योग्य नाही, याची शिकवण देणारी ही चिमुरडी... मरिअम असीफ सिद्दीकी... मीरारोडच्या कॉस्मॉपोलिटन हायस्कूलमध्ये शिकणारी मुस्लिम मुलगी. मात्र भगवद्गीतेवर आधारित लेखी स्पर्धेत तिनं पहिला नंबर पटकावल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. इस्कॉनच्या वतीनं फेब्रुवारी महिन्यात 'गीता चॅम्पियन्स लीग' स्पर्धा घेण्यात आली. त्यात तिला 100 पैकी 100 गुण मिळाले.
गीतेमध्ये जीवनाचं सार सामावलेलं आहे, असं हिंदू धर्मीय मानतात. मात्र गीतेचं तत्वज्ञान विशिष्ट धर्मापुरतं मर्यादित नाही, हे मरिअमनं सप्रमाण सिद्ध केलंय. मानवता हाच खरा धर्म असल्याचं ती मानते.
मुस्लिम असूनही भगवद्गीतेचा अभ्यास करण्याचं बाळकडू मरिअमला मिळालं, ते तिच्या घरातूनच... मरिअमला एवढ्या लहान वयातच खरा गीता-धर्म समजला... धर्माधर्मामध्ये भांडणं लावणा-यांना आणि पिढ्यानपिढ्या विखारी बीजं पेरणा-यांना तो कधी समजणार?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.