जास्त काम केल्यामुळे माझा पराभव झाला असेल - राणे

काँग्रेस नेते आणि माजी आमदार नारायण राणे यांनी आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचित मंत्रिमंडळावर टीका केलीय. हे मंत्रिमंडळ दिलेली आश्वासनं पूर्ण करू शकेल, असं वाटत नाही असं नारायण राणे यांनी म्हटलंय. तर, जास्त काम केल्यामुळे आपला कुडाळमध्ये पराभव झाला असावा, असंही नारायण राणेंनी यावेळी म्हटलंय. 

Updated: Nov 4, 2014, 04:53 PM IST
जास्त काम केल्यामुळे माझा पराभव झाला असेल - राणे title=

मुंबई : काँग्रेस नेते आणि माजी आमदार नारायण राणे यांनी आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचित मंत्रिमंडळावर टीका केलीय. हे मंत्रिमंडळ दिलेली आश्वासनं पूर्ण करू शकेल, असं वाटत नाही असं नारायण राणे यांनी म्हटलंय. तर, जास्त काम केल्यामुळे आपला कुडाळमध्ये पराभव झाला असावा, असंही नारायण राणेंनी यावेळी म्हटलंय. 

काय काय म्हटलंय नारायणे राणेंनी या पत्रकार परिषदेत...  
| पराभवानंतर पहिलीच पत्रकार परिषद
| आघाडी तुटली तेव्हाच सत्ता जाणार हे निश्चित होतं - नारायण राणे
| आश्वासनं पूर्ण करण्याची क्षमता फडणवीसांमध्ये नाही
| फणडवीसांची प्रतिमा चांगली पण, मुख्यमंत्र्यांचं चातुर्य नाही
| अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी वेगळ्या विदर्भाची भाषा करू नये
| अन्यथा त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहू नये
| आत्ताचं मंत्रिमंडळ खूपच कमजोर
| दिलेली आश्वासनं पूर्ण करू शकतील, असं वाटत नाही - राणे
| आत्ताच्या मंत्रिमंडळात खडसे सोडून एकही उल्लेखनीय नाव नाही
| राष्ट्रवादीचा पाठिंबा स्वसंरक्षणासाठी की स्थिर सत्तेसाठी?
| शिवसेनेचं नेतृत्व सत्तेसाठी लाचार झालंय
| शिवसेना एव्हढी लाचार होईल असं वाटलं नव्हतं...
| आत्ता साहेब असते, तर सत्तेवर लाथ मारून विरोधात बसले असते
| स्वाभिमानाच्या गोष्टी शिवसेनेनं करू नये - राणे
| उद्धव ठाकरेंनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला
| काम केल्यानंतर माझा कुडाळमध्ये पराभव झाला - राणे
| जास्त काम केल्यामुळे माझा पराभव झाला असेल - नारायण राणे
| टोलबाबत सत्ताधाऱ्यांचं घुमजाव - राणे
| टोल बंद होईल, असं वाटत नाही
| निधी गायब करणाऱ्यांवर कारवाई करा - राणे
| निधी पोहचवण्याची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाणांची
| मोदींचा प्रभाव दिवसेंदिवस घसरतच चाललाय
| निर्णय घेताना महाराष्ट्राच्या मंत्र्यांमध्ये धमक हवीय
| मी दुग्धविकास मंत्री झालो तेव्हापासून निर्णयासाठी कुणावर अवलंबून नव्हतो - राणे
| एमआयएमचे विचार देशाला घातक - राणे

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.