... यापुढे कुणालाही रस्त्यांवर मंडप उभारता येणार नाहीत!

रस्ते हे रहदारीसाठी असतात, मंडप बांधण्यासाठी नाहीत असे स्पष्ट मत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलंय. 

Updated: Mar 14, 2015, 03:13 PM IST
... यापुढे कुणालाही रस्त्यांवर मंडप उभारता येणार नाहीत! title=

मुंबई : रस्ते हे रहदारीसाठी असतात, मंडप बांधण्यासाठी नाहीत असे स्पष्ट मत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलंय. 

मुंबई हायकोर्टानं गणेशोत्सव, नवरात्री आणि इतर सर्व उत्सवांदरम्यान रस्त्यांवर मंडप उभारण्यास बंदी केलीय. ठाण्यातील रहिवासी महेश बेडेकर यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टानं हे आदेश दिलेत. 

तसंच उत्सवांदरम्यान लागणारे लाऊड स्पीकर्सही बेकायदेशीरच आहेत. महापालिकेच्यावतीनं आयुक्तांना यासंदर्भात आपले विशेषाधिकार वापरून परवानगी देता येते. मात्र, जर त्याचा लोकांना त्रास झाला आणि त्यासंदर्भात तक्रार आली तर पोलिसांना कारवाई करणं अनिवार्य असणार आहे. तसंच तक्रारदाराच्या नावाची गोपनीयता राखणं पोलिसांची जबाबदारी राहणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.