मुंबई : मेट्रो प्रवाशांना मुंबई हायकोर्टाने तात्पुरसता दिलासा दिलाय. मेट्रोची प्रस्तावित भाडेवाड तूर्तास टळलीये.
११ फेब्रुवारीपर्यंत मेट्रोच्या तिकीटांचे दर जैसे थे राहणार आहेत. यामुळे प्रवाशांना तात्पुरता का होईना दिलासा मिळालाय.
मेट्रोची प्रस्तावित भाडेवाढ करण्यास हायकोर्टाने शुक्रवारी सुनावणीदरम्यान नकार दिला. तसेच एमएमआरडीए आणि रिलायन्सवर यावेळी कोर्टाने ताशेरे ओढले.