नोटबंदी : राज्यातील भाजप आमदारांकडून मागवली बॅंक व्यवहारांची माहिती

नोटबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर किती आणि कसा परिणाम झाला याबद्दल वाद सुरु असतानाच, राज्यातील भाजपच्या सर्वच आमदारांना ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान केलेल्या व्यवहाराची माहिती पक्षाकडे सादर करण्याचे आदेश मिळाले आहेत.

Updated: Jan 11, 2017, 06:40 PM IST
नोटबंदी : राज्यातील भाजप आमदारांकडून मागवली बॅंक व्यवहारांची माहिती title=

मुंबई : नोटबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर किती आणि कसा परिणाम झाला याबद्दल वाद सुरु असतानाच, राज्यातील भाजपच्या सर्वच आमदारांना ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान केलेल्या व्यवहाराची माहिती पक्षाकडे सादर करण्याचे आदेश मिळाले आहेत.

८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या दरम्यान बँकांमधील खात्याच्या मार्फत नेमके कुठले व्यवहार केले. या सबंधीचे कागदपत्रे पक्षाचे प्रतोद राज पुरोहित यांना १५ जानेवारीपर्यंत करण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. याचे भाजप आमदारांनी स्वागत केले आहे.