यापुढे रेशन कार्ड हा निवासी पुरावा नाही

रेशन कार्ड हे निवासी पुरावा म्हणून आता या पुढे कोणत्याही सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयात यापुढे चालणार नाही. याबाबत परिपत्रक काढून अन्न आणि पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी कोणत्याही कामासाठी आपण सर्व प्रथम रेशन कार्डाचाच वापर करायचो, आता मात्र हे चित्र बदलणार आहे.

Updated: Nov 22, 2015, 08:40 PM IST
यापुढे रेशन कार्ड हा निवासी पुरावा नाही title=

मुंबई : रेशन कार्ड हे निवासी पुरावा म्हणून आता या पुढे कोणत्याही सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयात यापुढे चालणार नाही. याबाबत परिपत्रक काढून अन्न आणि पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी कोणत्याही कामासाठी आपण सर्व प्रथम रेशन कार्डाचाच वापर करायचो, आता मात्र हे चित्र बदलणार आहे.

ज्या सरकारी कार्यालयामध्ये रेशन कार्ड हा निवासी दाखला म्हणून मागितला जातो, अशा सर्वच कार्यालयाना असे सांगण्यात आले आहे की, यापुढे कोणत्याही सरकारी कार्यालयात आणि इतर कार्यालयातही रेशन कार्ड हा वास्तव्याचा पुरावा म्हणून ग्राहय धरला जाणार नाही.
 
कारण रेशन कार्ड दिले जाते, त्यावेळेस संबंधी रहिवाशाच्या निवासीजागे विषयी कोणत्याही प्रकारची इत्यंभूत अथवा पुरेशी माहिती घेतली जात नाही. त्यामुळे रेशन कार्ड हा निवासी दाखला म्हणून चालू शकत नाही. 

आधी ही या सबंधी सरकारने जून २०१० मध्ये परीपत्रक काढले होते. तरी अजून ही अनेक कार्यालयामध्ये रेशन कार्ड हे निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येत आहे. या सरकारने नवीन परिपत्रक काढले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.