डोळ्यात मिरचीची पूड फेकून एकाची हत्या

काल रात्री मुंबईतल्या दिंडोशीमध्ये एकाची डोळ्यात मिरची पूड टाकून हत्या करण्यात आलीय. 

Updated: Jan 20, 2016, 02:43 PM IST
डोळ्यात मिरचीची पूड फेकून एकाची हत्या title=

मुंबई : काल रात्री मुंबईतल्या दिंडोशीमध्ये एकाची डोळ्यात मिरची पूड टाकून हत्या करण्यात आलीय. 

मृत व्यक्तीचं नाव फिलीप नाडर असल्याचं सांगितलं जातंय. नाडर राहात असलेल्या इमारतीच्या खालीच रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.

मारेकऱ्यांनी अगोदर फिलीपच्या डोळ्यांत मिरचीची पूड फेकली आणि त्यानंतर त्याच्या डोक्यावर बांबूचे घाव घातले. पोलिसांना घटनास्थळी दारूची बाटली आणि मिर्ची पावडर सापडलीय.

फिलीप हे कासमबाग भागात इडली आणि ट्रॅव्हलचा व्यवसाय करत होते. ते एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचंही सांगितलं जातंय. 

या प्रकरणात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल झाला असून परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दृष्यांची तपासात मदत घेतली जाणार आहे.