पालघरनंतर आता दक्षिण मुंबईत पडला भला मोठा खड्डा

मुंबईपासून जवळच असलेल्या पालघर येथे दोन दिवसांपूर्वी रात्री पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यानंतर आता तसाच खड्डा दक्षिण मुंबईतील रेडियो क्लबच्या परिसरात समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या भिंतीजवळील फुटपाथवर पडला आहे.

Updated: Jun 24, 2015, 01:43 PM IST
 पालघरनंतर आता दक्षिण मुंबईत पडला भला मोठा खड्डा title=

मुंबई : मुंबईपासून जवळच असलेल्या पालघर येथे दोन दिवसांपूर्वी रात्री पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यानंतर आता तसाच खड्डा दक्षिण मुंबईतील रेडियो क्लबच्या परिसरात समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या भिंतीजवळील फुटपाथवर पडला आहे.

प्रथम दर्शनी या खड्ड्यात समुद्र किनारी असणारी रेती होती पावसाच्या पाण्याने ती रेती वाहून गेली आणि त्यामुळे हा भला मोठा खड्डा पडल्याचे दिसते आहे. 
 
हा खड्डा तब्बल १० फूट खोल आहे. पेव्हर ब्लॉक असलेल्या फूटपाथवर अचानक इतका मोठा खड्डा पडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप तरी हा खड्डा बुजविण्यात आलेला नाही. मात्र एवढा मोठा खड्डा कसा पडला याबाबत गूढ काय आहे.

पहिल्याच पावसानं १०-१२ फुटांचा पेव्हर ब्लॉक खचल्यानं महापालिकेच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे. पेव्हर ब्लॉक निकृष्ठ दर्जाचे असल्याचं यातून उघड होतं आहे. रस्त्यातच १०-१२ फुटांचा खड्डा पडल्यानं येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.