Exclusive: मुंबईतील खाजगी,टुअरिस्ट टॅक्सींचं सुरक्षेबाबतचं वास्तव

दिल्लीमध्ये उबर कॅबमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर खाजगी टॅक्सी आणि टूरिस्ट कॅब संशयाच्या विळख्यात आले आहेत. खाजगी संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅब का होऊ शकतात दुर्घटनांचं कारण, याचा तपास करणारा हा रिपोर्ट...

Updated: Dec 11, 2014, 08:31 PM IST
Exclusive: मुंबईतील खाजगी,टुअरिस्ट टॅक्सींचं सुरक्षेबाबतचं वास्तव title=

मुंबई: दिल्लीमध्ये उबर कॅबमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर खाजगी टॅक्सी आणि टूरिस्ट कॅब संशयाच्या विळख्यात आले आहेत. खाजगी संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या कॅब का होऊ शकतात दुर्घटनांचं कारण, याचा तपास करणारा हा रिपोर्ट...

ओला कॅब

26 वर्षीय अनिल सिंह यांची सकाळी अकाराच्या सुमारास वरळीतील महेंद्रा टॉवर जवळ भेट होते. तेव्हा ते आपल्या ओला कॅबची साफसफाई करत असतात. ओलानं कशाच्या आधारे तुमची आणि तुमची टॅक्सी निवडली, असं विचारलं असता त्यांनी सांगितलं, "मी बस माझं ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीचे कागदपत्र घेऊन ओला कॅबच्या मालाडच्या ऑफिसमध्ये गेलो, तिथं गाडीवर त्यांनी आपलं स्टिकर लावलं आणि अॅग्रिमेंट तयार करून दिलं." अनिल सिंह यांनी कोणत्याही प्रकारचा गणवेश घातला नव्हता, त्याबद्दल त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, "एकदा अॅग्रिमेंट तयार झाल्यानंतर आम्हाला पुन्हा तिथं जाण्याची गरज नसते, ना ही ते आमच्यावर लक्ष ठेवत, ट्रॅफिक वाले जेव्हा दिसतात तेव्हा खाकी अंगात घालतो, त्यानंतर कोण पाहणारं असतं."

ओलाचे सीईओ आणि को-फाऊंडर भवीश अग्रवाल याबद्दल उत्तर देण्यास तयार नाहीय. ओला कॅबच्या मालाड ऑफिसला जेव्हा पहिले ड्रायव्हर म्हणून आमच्या प्रतिनिधीनं फोन केला तेव्हा त्यांनी मालाड ऑफिसमध्ये आपली गाडी आणि कागदपत्रांसह तिथं बोलावलं. मात्र ड्रायव्हर ठेवण्यासाठीच्या धोरणांवर कोणीही तयार नव्हतं. सोशल नेटवर्कवर सक्रीय असलेले ओला कॅबचे सीईओ आणि को-फाऊंडर भवीश अग्रवाल यांच्याशी न फोनद्वारे संपर्क होऊ शकतो, ना ही फेसबुकवरील मॅसेज पाहून त्यांना उत्तर देणं गरजेचं वाटलं. 

मेरू कॅब

आता चला जरा मेरू कॅबबद्दल पाहू... मेरू कॅबचं मुख्यालय मीरा रोडमध्ये आहे. याच ऑफिसमध्ये काम करणारे मार्केटिंग एक्झिकेटीव्ह सुनील सिंह सांगतात, "आमच्याकडे सर्वात आधी तर ड्रायव्हरचा इंटरव्ह्यू घेतला जातो. ज्यात त्याची कौटुंबिक पार्श्वभूमि, ड्रायव्हिंगचा त्याचा अनुभवाबद्दल चर्चा होते. त्यानंतर सर्व मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाते. यासगळ्यात पास झाल्यानंतर त्यांना तीन दिवसाचं ट्रेनिंग दिलं जातं. ज्यात यूनिफॉर्म कोडबाबत माहिती दिली जाते, जीपीएस तंत्रज्ञाबद्दल माहिती दिली जाते, मेडिकल चेक-अप होतं आणि त्यांना कंपनीचं आयडी कार्ड दिलं जातं." त्यांच्या मते मेरूचा ड्रायव्हर होण्यासाठी कमीतकमी पात्रता तीन वर्षांचा अनुभव, कमर्शियल ड्रायव्हिंग लायसंस आणि वयोमर्यादा 25-57 वर्ष आहे, 25 पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना मेरू आपला ड्रायव्हर बनवत नाही, सुनील याचं कारणही सांगतात, "25 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांमध्ये परिपक्वता नसते, त्यांच्यासोबत छोट्या-छोट्या बाबतीत भांडणाची शक्यता असते." 

"एक मुलगा एकट्याच्या भरवश्यावर मुलीवर बलात्कार करतो, हे मला सत्य वाटत नाही", असं सुनीलचं म्हणणं आहे. तर त्यांच्या अनेक बाबींना मेरूचे ड्रायव्हर फेटाळतात. 45 वर्षीय शिवमंगल निर्मल यांच्यासोबत लोअर परेलच्या फिनिक्स मॉलमध्ये आमच्या प्रतिनिधीची भेट झाली. ते सांगतात, "तिथं फक्त हे पाहिलं जातं की ड्रायव्हरला वाचता-लिहिला येतं की नाही, याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स आणि अॅड्रेस प्रूफची फोटोकॉपी घेतली जाते, एका दिवसाचं ट्रेनिंग होतं त्यात ग्राहकासोबत बोलण्याची पद्ध आणि युनिफॉर्मबद्दल सांगितलं जातं."

मेरू वाले आयडी कार्ड देतात? 

या प्रश्नाचं उत्तर देतांना निर्मल सांगतात, "फक्त गाडीमध्ये हा टॅब फिट करतात, ज्यात कस्टमरचं नाव आणि पत्ता येतो, आयडी कार्ड किंवा काहीही देत नाहीत." दिल्लीतील उबर कॅब प्रकरणात घडलेल्या घटनेबद्दल शिवमंगल सांगतात, "ही सर्व कंपनीला बदनाम करण्याची योजना आहे, बलात्कार घरात होऊ शकतो, एकांतात होऊ शकतो आणि दोन-तीन लोकं मिळून करू शकतात, पण एक व्यक्ती एकट्याच्या भरवश्यावर मुलीवर बलात्कार करतील, हे मला खरं वाटत नाही." सोबतच शिवमंगल यांनी हे सुद्धा सांगितलं की, त्यांनाही काही दिवसांत उबर कॅबमध्ये नोकरी करायची आहे. 

आता मेरूचा दुसरा ड्रायव्हर अक्षर शर्मा याला फोन केला असता त्याचं वय 22 वर्ष असल्याचं कळलं. त्याला 25 वर्षाच्या वयोमर्यादेबद्दल विचारलं तर तो म्हणाला, माझ्या माहितीप्रमाणे फक्त कमर्शियल ड्रायव्हिंग लायसंस असणं गरजेचं आहे, मग तुमचं वय 22 वर्ष असलं तरी चालेल. 

इजी कॅब

इजी कॅबचे जनरल मॅनेजर संजीव राणा मीडियाच्या नावावर बोलण्यास तयार झाले नाही आणि त्यांनी डायरेक्टर ऑपरेशन्स राजेश मुंजाल यांच्याशी संपर्क साधायला सांगितलं. राजेश सोबत संपर्क होऊ शकला नाही, पण ड्रायव्हर वेंडर मॅनेजर एचपी कौशिक यांच्या मते इजी कॅबच्या प्रत्येक ड्रायव्हरच्या कागदपत्रांची सत्यता तपासली जाते, सोबतच त्यांची थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन आणि पोलीस व्हेरिफिकेशन पण केलं जातं. ते सांगतात, "सर्व व्हेरिफिकेशन सत्य असल्यास आम्ही ड्रायव्हरला एका दिवसाचं प्रशिक्षण देतो, ज्यात त्यांना ड्रायव्हिंगचे नियम, रस्त्यावर घेतली जाणारी काळजी याबद्दल सांगितलं जातं."

यादरम्यान इजी कॅबच्या ड्रायव्हरशी आमचा संपर्क झाला नाही. पण मुंबई ट्रॅफिक पोलीसचे जॉइंट पोलीस कमिश्नर डॉ. बी. के. उपाध्याय सांगतात, "कागदपत्रांची तपासणी सुरू झालीय पण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास अजून झालेला नाही, दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर आता आरटीओ आणि पोलीस विभाग मुंबईत असलेल्या 50 हजार टॅक्सींसह जवळपास 1 लाख ड्रायव्हर्सच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपास सुरू झालाय."

मेरू कॅब, टॅब कॅब आणि इजी कॅबच्या टॅक्सींच्या महाराष्ट्र सरकारच्या नियमांचं पालन करायचं असतं. तर ओला कॅब, उबर कॅब आणि बुक माय कॅब सारख्या कंपन्यांना टूरिस्ट टॅक्सी अंतगर्त असलेल्या नियमांचं पालन करायचं असतं, त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारचे नियम लागू होत नाहीत. खरं तर या सर्व नियमांची पायमल्ली करत टॅक्सी बिनधास्त लोकल रूटवर चालू असते. विशेष म्हणजे वर दिलेल्या तीन कंपन्यांच्या तर आपल्या स्वत:च्या गाड्या सुद्धा नाहीयेत, त्यांचे फक्त कॉल सेंटर आहेत. ते बस ड्रायवर्सना ग्राहकांशी जोडण्यातून मिळणाऱ्या कमिशनवर त्यांच्या सर्व कमाई असते. 

टुरिस्ट टॅक्सीला फक्त टुरिझमपर्यंत मर्यादित ठेवलं पाहिजे

मुंबई टॅक्सी युनियनचे अध्यक्ष अँथोनी क्वाड्रोस सांगतात, "ओला, उबर आणि बुक माय कॅब लोकल रूटवर प्रतिबंधित करायला हवी. त्यांच्याजवळ आपली गाडी सुद्धा नाहीय आणि कोणता गुन्हेगारही आपली गाडी त्यांच्या डेटाबेसमध्ये रजिस्टर करून ग्राहकाला उचलू शकतात." त्यांच्या मते पिवळ्या रंगाचं छत असलेल्या टॅक्सी मेरू आणि टॅब कॅब टुअरिस्ट टॅक्सींच्या तुलनेत प्रवाशांसाठी सुरक्षित आहे कारण मुंबईमध्ये टॅक्सी चालवण्याची मान्यता देण्यापूर्वी प्रत्येक ड्रायव्हरचं सीआयडी व्हेरिफिकेशन केलं जातं. 

पण टुअरिस्ट टॅक्सीच्या प्रकरणात असं होत नाही. पण जर टॅक्सी युनियन लीडरचं बोलणं शंभर टक्के खरं असतं तर स्पेशल ब्रांच, काइम ब्रांच, मुंबईचे सर्व पोलीस स्टेशन आणि ट्रॅफिक पोलीसांनी आजपासून सुरू झालेलं महाअभियानाचा भाग झाला नसता, ज्याबद्दल जॉइंट पोलीस कमिश्नर यांनी सांगितलं. 

(सौजन्य़: I am mean.in)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.