www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
घाटकोपर रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातामध्ये दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरे या तरुणीला पाच लाखांची मदत रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केलीय. मोनिकाला मदत मिळावी यासाठी झी मीडियानं आवाहन केल्यानंतर समाजतल्या वेगवेगळ्या क्षेत्रातून तिला मदतीचा ओघ सुरु झाला होता. झी मीडियाच्या या पाठपुराव्याची दखल रेल्वेमंत्र्यांनीही घेतलीय.
शिवाय मुंबईतल्या ७४ धोकादायक प्लॅटफॉर्म्सची उंची वाढवण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वमंत्री मल्लिकार्जुन खरगेंनी केली आहे. पुढील तीन वर्षात प्लॅटफॉ़र्म्सचे काम मार्गी लावण्यात येणार आहे. याबाबत आगामी रेल्वे अर्थसंकल्पात याबाबत तरतूद करण्यात येणार आहे.
प्लॅटफार्म आणि लोकल गाड्यांच्या प्रवेशद्वारात मोठे अंतर असल्यामुळं अनेक अपघात झाले आहेत. याबाबत झी मीडियानं वेळोवेळी वृत्त लावून आवाज उठवला होता. त्यानंतर रेल्वे प्रशानानं याबाबत दखल घेण्याचं आश्वासन दिलं होतं. रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी याबाबत तातडीनं प्लॅटफॉर्म्सची कामे मार्गी लावण्याची घोषणा केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.