सचिन तेंडुलकरची 'डी लिट' पदवी डिलीट?

 मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात हरीतक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना डी लिट पदवी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, ही घोषणा वादात सापडण्याची शक्यता आहे.

Updated: Mar 30, 2016, 11:32 PM IST
सचिन तेंडुलकरची 'डी लिट' पदवी डिलीट? title=

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात हरीतक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना डी लिट पदवी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, ही घोषणा वादात सापडण्याची शक्यता आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मुंबई विद्यापीठाची डि लिट पदवी प्रदान करावी अशी चर्चा 2014 मध्ये अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात झाली होती. पण यावर्षीच्या अर्थसंकल्पात कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी अचानक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचा डि लिट पदवीने सन्मान करण्याची घोषणा केली. त्यामुळे सचिन तेंडुलकरचं नाव डावललं गेल्याचा आरोप मनसेनं केलाय.
 
गेल्या 15 वर्षात मुंबई विद्यापीठाकडून कोणालाही डी लिट ही पदवी देण्यात आलेली नाही. 2002 मध्ये डॉ. अमर्त्य सेन यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यानंतर 2014 च्या अधिवेशनात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांना डी लिट पदवीचा सन्मान देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र त्याबाबत पुढे काय झालं यावर विद्यापीठाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.