मुंबई : उच्चभ्रू मुंबईकरांना झोप येईना!, नरेंद्र मोदींनी उडवली अनेकांची झोप, मोदींच्या निर्णयामुळे कित्येकांचा बीपी वाढला...ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. काळा पैसा लपवायचा कुठे? बँकेत तरी कसा द्यायचा? कमवलेला हा पैसा वाया जाणार? या पैश्यांचं आता करायंच तरी काय ? असा प्रश्न पडलेल्या अनेकांची सध्या झोप उडालीय.
मुंबईतल्या कुलाबा, फोर्ट, बीकेसी, माटुंगा, अंधेरी अशा उच्चभ्रू वस्त्यांमध्ये असणा-या मेडिकल दुकानांमध्ये सध्या झोपेच्या गोळ्या आणि बीपीच्या गोळ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होतेय.
इतकच नाही तर अनेकदा ग्राहकांना हाय पॉवरच्या गोळ्या फार्मसीस्टकडून नाकारल्या जातायत. काळा पैसा लपवणा-यांना मोदी सरकारच्या या निर्णयामुळे चांगलाच धक्का बसलाय. त्यामुळे ज्यांना आजही काळा पैसा लपवावा कुठे हे कळत नाहीय त्यांना अशा झोपेच्या गोळ्या घ्यावा लागतायत का असा प्रश्न आहे.
मोदी सरकारने घेतलेल्या नोटा बंदीच्या निर्णयाचे स्वागत होत असले तरी अनेकांना सुट्टे पैसे काढण्यासाठी मनस्ताप होतोय. पण ज्यांच्यावर निशाणा साधत मोदीजींना हा निर्णय घेतला त्यांची झोप उडाली असून बीपीही वाढल्याचे वृत्त आहे.