शिवसैनिकांनी बनवले बाळासाहेबांचे गुगल डुडल

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुगलने डुडलद्वारे सलामी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. मात्र आता स्वत: शिवसैनिकांनी बाळासाहेबांचे डुडलचे चित्र तयार केलं आहे. सध्या व्हॉट्स अॅपवर हे डुडल फॉरवर्ड केलं जात आहे.

Updated: Jan 19, 2015, 06:58 PM IST
शिवसैनिकांनी बनवले बाळासाहेबांचे गुगल डुडल title=

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुगलने डुडलद्वारे सलामी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. मात्र आता स्वत: शिवसैनिकांनी बाळासाहेबांचे डुडलचे चित्र तयार केलं आहे. सध्या व्हॉट्स अॅपवर हे डुडल फॉरवर्ड केलं जात आहे.

 
येत्या २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची ८९ वी जयंती आहे.  यानिमित्ताने गूगलकडून मुंबईत मराठी माणसाच्या उद्धारासाठी बाळासाहेबांनी केलेल्या कामाचा गौरव केला जावा, अशा मागणीचं पत्र खासदार राहुल शेवाळे यांनी ६ जानेवारी रोजी गूगलला लिहिलं आहे.
या संदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्री अरूण जेटली यांनाही पत्र पाठविले होते. 
 
मात्र गूगलकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. २३ जानेवारीला गूगल बाळासाहेबांचं डुडल बनवणार की नाही, याबाबत अजुनही गुगलकडून दुजोरा मिळालेला नाही. पण बाळासाहेबांच्या प्रेमापोटी शिवसैनिकांनी डुडल चित्र फॉरवर्ड केले जात आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.