शिवसेनेचा हा बंडोबा थंडोबा नाही...

 वॉर्ड क्रमांक १९४ चे शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार महेश सावंत यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केलाय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 8, 2017, 05:18 PM IST
शिवसेनेचा हा बंडोबा थंडोबा नाही... title=

मुंबई :  वॉर्ड क्रमांक १९४ चे शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार महेश सावंत यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केलाय. 

तसेच आपला विजय बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करणार असल्याचे त्यांनी म्हटलेय. उमेदवारी मागे घेण्यासाठी पद, पैसा अशी विविध प्रलोभने दाखवली गेली असा आरोप महेश सावंत यांनी केला आहे. 

 

194 वार्डात शिवसेनेने आमदार सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान यांना उमेदवारी दिलीय. तर मनसे चे विद्यमान नगरसेवक संतोष धुरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

महेश सावंत यांच्या उमेदवारीमुळे या वार्डातली राजकीय समीकरणेच बदलून गेली आहेत. महेश सावंत यांची या वार्डात लोकप्रियता आणि मसल पॉवरही आहे.