मुंबई : विधानसभा निव़णुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आघाडी घेत व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केलंय. दादरच्या शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे भव्य स्मारक दाखवण्यात आलंय.
मात्र यामुळं मनसेची ब्ल्यू प्रिंट कधी प्रसिद्ध होणार आणि त्यात काय असणार याची उत्सुकता लागलीय. तर दुसरीकडे भाजपच्या पावलावर पाऊल ठेवत शिवसेनेनंही हायटेक मार्गांचा अवलंब केलाय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनाभवनातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधल्या पदाधिका-यांशी संवाद साधला.
शिवसेनाभवनात आज या प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यभरातल्या पदाधिका-यांशी प्रत्यक्षात आणि जलद संपर्क व्हावा यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचललंय. या निमित्तानं मात्र शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडीत घेतलीय़.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.