मुंबई : शिवसेनेने पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य करत नवा वाद निर्माण केला आहे. 'मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घेतला पाहिजे, तेव्हाच मुस्लीम व्होट बॅकिंगचं राजकारण थांबेल ' असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राउत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये लिहिलंय, 'मुसलमानांची वोट बॅंक हा आता चिंतेचा आणि तितकाच डोकेदुखीचा विषय बनला आहे. प्रत्येकजण व्होट बॅंकेचेच राजकारण करत असतो.
' बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला त्यांनी दिलाय. 'व्होट बॅंकेची अशी सौदेबाजी रोखायची असेल तर मुसलमानांचा मतदानाचा हक्क काढा' अशी बाळासाहेबांनी मागणी केली होती, असं त्यांनी सामनात म्हटलंय.
कॉंग्रेस प्रवक्ता मीम अफजल यांनी संजय राऊतांचं वक्तव्य संविधानाच्या विरोधी असल्याचे सांगितले आहे. संजय राऊतांनी हा लेख ओवैसी बंधूंवर लिहिला होता. त्यात त्यांनी ओवैसी बंधूंना सापाची पिल्ले म्हटलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.