मुंबई : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. काही उपसूचनांसह शिवसेनेने प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याचं सांगण्यात येत आहे. स्मार्ट सिटीला शिवसेनेने केलेला विरोध तुर्तास तरी मावळताना दिसतोय, दुसरीकडे मनसेनेही सशर्त स्मार्ट सिटी प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.
शिवसेनेकडून प्रस्तावा मंजुरी देत असताना काही उपसूचना देण्यात आल्या आहेत. समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने स्मार्ट सिटी प्रस्तावाला विरोध केला आहे. सभेला राष्ट्रवादीचे गटनेते अनुपस्थित होते. शिवसेनेने प्रस्तावाला मंजुरी दिल्याने, काँग्रेसने शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.
यापूर्वी स्मार्ट सिटीला मंजुरी दिली तर महापालिकेचे अधिकार आणि बजेट कमी होईल असं सांगण्यात येत होतं, म्हणून शिवसेनेने शेवटपर्यंत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती.