मुंबई : राजकीय इच्छा शक्तीचा अभाव असल्याने ती खडतर मार्गावरूनही रस्ता काढत, महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना सेवा देतेय. अनेक राजकीय पक्षांचा संताप एसटी सहन करतेय, तोडफोड, आर्थिक आव्हाने स्वीकारत एसटी आपली वाट काढतेय, या एसटीचा आज वाढदिवस.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची स्थापना १ जून १९४८ या दिवशी झाली. याच दिवशी पुणे - अहमदनगर ही पहिली बस धावली . १ जून २०१५ या दिवशी एस टी ६८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
एस टी च्या स्थापनेच्या दिवसापासून आजतागायत 'एसटी'च्या ज्या समस्या आहेत त्या कायम आहेत . 'एसटी'ला ना स्वायतता , ना ही कुठल्या प्रकारच्या सवलती, उलट एस टी विविध सवलती प्रवासांना देते आहे .
एका बस मागे चार जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते 'एसटी'आज राज्यात एस टी बसेसची संख्या १७ हजार आहे. ३० विभाग , २५८ आगार ,आणि १ लाख १३ हजार कर्मचारी एस टी च्या सेवेत आहेत.
प्रवासी कर सवलत , इंधन कर सवलत , कर्मचारी भरती अनास्था , टोल टॅक्स , एस टी देत असलेल्या विविध सवलती बदल्यात शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत न मिळणे , या सर्व विविध कारणांमुळे एस टी चा विकास होत नाही .
राजकीय इच्छा शक्तीच्या अभावामुळे 'एसटी'च्या विकासाला स्पीड ब्रेकर लागलाय. ग्रामीण भागाची, राज्यातील सर्वसामान्यांची जीवन वाहिनी असलेल्या 'एसटी'ला अच्छे दिन येण्यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.