आजपासून लोकलचा फर्स्ट क्लास प्रवास महागला

आजपासून मुंबईकरांचा फर्स्ट क्लासचा लोकल प्रवास महाग होणार आहे. आजपासून सर्व्हिस टॅक्स १२ टक्क्यांहून १४ टक्के लागू होणार आहे. त्यामुळं एक्स्प्रेस गाड्यांच्या एसी फर्स्ट क्लास प्रवासाबरोबरच मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलचा फर्स्ट क्लास प्रवासही महाग होणार आहे. एसी आणि फर्स्ट क्लासच्या प्रवासात अर्ध्या टक्क्यानं वाढ होईल.

Updated: Jun 1, 2015, 09:05 AM IST
आजपासून लोकलचा फर्स्ट क्लास प्रवास महागला title=

मुंबई : आजपासून मुंबईकरांचा फर्स्ट क्लासचा लोकल प्रवास महाग होणार आहे. आजपासून सर्व्हिस टॅक्स १२ टक्क्यांहून १४ टक्के लागू होणार आहे. त्यामुळं एक्स्प्रेस गाड्यांच्या एसी फर्स्ट क्लास प्रवासाबरोबरच मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलचा फर्स्ट क्लास प्रवासही महाग होणार आहे. एसी आणि फर्स्ट क्लासच्या प्रवासात अर्ध्या टक्क्यानं वाढ होईल.

रेल्वे मोठ्या आर्थिक संकटातून जात असल्यानं नुकत्याच सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पातही भाडेवाढ होईल, अशी शक्यता होती. मात्र भाडेवाढ होणार नसल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 

पण दुसरीकडे केंद्रीय अर्थसंकल्पात सेवा कर वाढविण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळं रेल्वे प्रवाशांना त्याचा फटका बसला. लोकलच्या फर्स्ट क्लास पासवर आणि एसी तिकिटावर सध्या सेवा कर हा १२.३६ टक्के असून, त्यामध्ये ७० टक्के सूट देण्यात येते आणि तो कर ३.७ एवढा आकारला जात होता.

आता हाच कर १ जूनपासून जवळपास १४ टक्के एवढा होणार असून, त्यामध्ये नेहमीप्रमाणे ७० टक्के सूट दिल्यानंतर ४.२ टक्के एवढा होईल. यामुळे उपनगरीय लोकलचा फर्स्ट क्लासचा पास तसंच तिकीट आणि मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधील एसी फर्स्ट, एक्झिक्युटिव्ह क्लास, सेकंड आणि थर्ड एसी, एसी चेयर कार, एसी इकॉनॉमी क्लासची तिकिटं महागणार आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.