मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारात सर्वांना संधी देण्यात आली, मात्र शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना वगळण्यात आले. भाजपकडून डावलले गेल्यानं मेटे प्रचंड नाराज आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारात मित्र पक्षांसह सर्वांना संधी देण्यात आली, मात्र विनायक मेटेंना वगळण्यात आले. भाजपकडून डावलले गेल्यानं मेटे प्रचंड नाराज असून, भाजपने धोका दिल्याची भावना मेटेंनी व्यक्त केली आहे.
नाराज असलेल्या मेटेंनी विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधीलाही गैरहजर राहणे पसंत केले. मेटेंनी आमदारकीचीही शपथ घेतली नाही. शिवसंग्रामच्या पदाधिकारी आणि कार्यकरत्यांशी बोलून पुढील दिशा ठरवणार असल्याचेही ते म्हणाले.