विनयभंगाच्या आरोपावरुन मनसे नगरसेवक सुधीर जाधवांना अटक

मनसे नगरसेवक सुधीर जाधव यांना अटक करण्यात आली आहे. सुधीर जाधव यांच्यावर विनयभंगाचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात ही तक्रार करण्यात आली होती.

Updated: Feb 9, 2017, 03:20 PM IST
विनयभंगाच्या आरोपावरुन मनसे नगरसेवक सुधीर जाधवांना अटक title=

मुंबई : मनसे नगरसेवक सुधीर जाधव यांना अटक करण्यात आली आहे. सुधीर जाधव यांच्यावर विनयभंगाचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात ही तक्रार करण्यात आली होती.

फोनवरून आक्षेपार्ह मजकूर पाठवल्याचं तक्रारदार महिलेनं म्हटलंय.  थोड्याच वेळात सुधीर जाधवांना कोटार्त हजर करण्यात येणार आहे.सुधीर जाधव हे विद्यमान नगरसेवक असून त्यांची पत्नी स्नेहल जाधव यांना यंदा मनसेनं तिकीट दिलं आहे.