मुंबईत महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

मुंबईत आणखी एका वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली आहे. ही मारहाण महिला पोलीस कर्मचाऱ्याला आहे.

Updated: Sep 7, 2016, 09:17 AM IST
मुंबईत महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण title=
सौजन्य : फेसबूक

मुंबई : राज्यात पोलिसांवर हात उचलण्याचे प्रकार दिवसागणिक वाढताना दिसत आहे. खार येथे वाहतूक पोलीस विलास शिंदे यांना मारहाण केल्यानंतर त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मुंबईत आणखी एका वाहतूक पोलिसाला मारहाण करण्यात आली आहे. ही मारहाण महिला पोलीस कर्मचाऱ्याला आहे.

विले पार्ले इथे नाकाबंदी दरम्यान ड्युटीवर असलेल्या महिला वाहतूक पोलिसाने, विनाहेल्मेट दुचाकीस्वार महिलेला अडवले. मात्र यावेळी महिलेने पोलिसांशी हुज्जत घातली. त्यानंतर वाद झाला. वादानंतर दुचाकीस्वार महिलेने आपल्या भावाला फोन करुन बोलविले. त्याच्या उपस्थित तिने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. 

दरम्यान, पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरती पाटलेकर या महिलेला ताब्यात घेतले. या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.