५०० च्या नोटा ठेवल्याने चोराने एकाला बदडलं

हजार, पाचशेच्या नोटा मोदी सरकारने चलनातून बाद केल्याने, कधी ऐकले नसतील असे किस्से घडत आहेत. दिल्लीत चोरांनी पाचशेच्या नोटा ठेवल्या म्हणून एकाला मारहाण केली आहे.

Updated: Nov 10, 2016, 02:15 PM IST
५०० च्या नोटा ठेवल्याने चोराने एकाला बदडलं title=

मुंबई : हजार, पाचशेच्या नोटा मोदी सरकारने चलनातून बाद केल्याने, कधी ऐकले नसतील असे किस्से घडत आहेत. दिल्लीत चोरांनी पाचशेच्या नोटा ठेवल्या म्हणून एकाला मारहाण केली आहे.

बाईकवर आलेल्या चोरट्यांनी एका कामगाराचं पाकिट मारलं आणि पुढे जाऊन पाहिलं की यात ५०० च्या ३ नोटा आहेत. चलनातून बाद झालेल्या नोटा पाहून, चोरांचा राग अनावर झाला.

एवढंच नाही चोरट्यांनी बाईक माघारी घेतली आणि पुन्हा त्या कामगाराला विचारलं, ५०० च्याच नोटा का ठेवल्या, असं विचारत त्याला मारहाण केली तसेच कानशीलातही लगावली. अखेर चोरट्यांनी पैसे अंगावर फेकत धूम ठोकली. 

ग्रेटर नोएडात बांधकाम मजूर असलेल्या विकास कुमार यांची अशी पंचायत चोरांनी केलीय.