www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यात टोल धोरणात लवकरच बदल करण्यात येणारेय. राज्यसरकार खासगी चारचाकी वाहनांवरील टोल पूर्णपणे माफ करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. टोलमधून दिलासा देण्यासाठी राज्यसरकारकडून गांभीर्यानं विचार सुरू आहे. त्यामुळं निवडणुकांच्या तोंडावरच सरकारकडून सर्वसामान्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.
टोलविरोधातील उद्रेक लक्षात घेऊन सरकार हा निर्णय घेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. मात्र खाजगी चारचाकी वाहनांवरील टोल पूर्णपणे माफ केल्यास सरकारचा मोठा महसूल बुडेल. मात्र महसूल भरून काढण्यासाठी कंत्राटदाराला वाढवून देणं तसंच जड आणि व्यावसायित वाहनांवरील टोल वाढवणं या पर्यायांचा विचार सरकार करतंय. मात्र टोल धोरणासंदर्भात निर्णय घेण्यास सरकारनं उशीर करुन मतं मिळतील का हाच खरा प्रश्न आहे.
नवीन टोल धोरणात नेमकं काय असेल पाहूयात…
लहान खासगी चारचाकी राज्यभर टोलमुक्ती
व्यावसायिक आणि जड मोठ्या आणि अवजड वाहनांना टोलचा दर वाढणार
कार्यकाळ पूर्ण झालेले 45 टोल नाके बंद करण्यात येतील.
एसटीला सरसकट सर्व टोलमधून सूट मिळण्याची शक्यता
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.