www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसेच्या रास्तारोकोला काही वाहतूक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यात ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचाही समावेश आहे. यामुळे १२ फेब्रुवारी रोजी तब्बल २७ लाख वाहनं रस्त्यावर धावणार नाहीत, असं या संघटनेच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे.
या संपाचा राज्यात गॅस, पेट्रोलियम प्रॉडक्ट, अन्नधान्य, औषधं यांची वाहतुकीवर परिणाम होणार आहे. चेकपोस्ट आणि टोल प्लाझावर वाहनं उभी असतात, तेव्हा ८७ हजार कोटी रूपयांच्या इंधनाची नासाडी होते.
आज रात्री १२ वाजल्यापासून १२ फेब्रवारीच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकदारांनी संप पुकारला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणि बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात गॅस, पेट्रेलियम प्रॉडक्ट्स, अन्नधान्य, औषधं वगैरे वाहतूक करणारी तब्बल २७ लाख वाहनं या काळात धावणार नाहीत.
सध्याचा टोलऐवजी नॅशनल परमीट स्किमच्या धर्तीवर टोल परमिट सुरू करण्याची मागणी आहे. या परमिटमध्ये वर्षभराचा टोल एकदाच आगाऊ भरला जातो. यामुळे वेळ, इंधन, टोलची लूट थांबणार आहे, यासाठी ही मागणी केली असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे.
नॅशनल परमिट स्कीममध्ये केंद्राकडे १० हजार कोटी रूपयांचा महसूल जमा होईल. तसेच टोल नाक्यावर येणारा १० ते १५ कोटी रूपयांचा कर्मचाऱ्यांवर होणार खर्च वाचेल, असं संघटनेनं म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी आधीपासून टोलचा मुद्दा लावून ठेवला आहे. यामुळे मनसेला रास्तारोकोसाठी वाहकतूक बंद ठेऊन पाठिंबा देण्याचं संघटनेनं ठरवलं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.