मुंबई : व्ही. पी. रोड पोलिसांनी भुरटे चोर म्हणून ताब्यात घेतलेल्या तिघांच्या चौकशीतून दोन गंभीर गुन्हयांची उकल झाली. दोन अल्पवयीन मुलांची सामूहिक अनैसर्गिक अत्याचारानंतर हत्या केल्याचे पुढे आलेच.
पोलिसांनी तीन जणांना चोरीप्रकरणी ताब्यात घेतले. या तिघांनी अन्य तीन साथीदारांसह दोन अल्पवयीन मुलांवर सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केला. यानंतर दोघांची निर्घृण हत्या करून त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली.
यापैकी एक गुन्हा बहुचर्चित शक्तिमिलच्या निर्जन आवारात घडल्याची धक्कादायक महिती या तिघांच्या चौकशीतून समोर आली.
राजकुमार सिंघराज रापन्नन ऊर्फ कालीअण्णा (२३), सुनील नंदकिशोर कुमार (३०) आणि विशाल शालीग्राम पडघान (३०) अशी या तिघांची नावे असल्याचे समजते. पोलिसांना २९ डिसेंबरला तीन सराईत चोरटे घरफोडीसाठी गुलालवाडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून या तिघांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर या तिघांनी दोन गंभीर गुन्हयांची कबुली दिली.
यापैकी पहिला गुन्हा सप्टेंबर २०११मध्ये महालक्ष्मी परिसरातील शक्तिमिलच्या निर्जन आवारात घडला. या तिघांनी सिराज, राज चिकना ऊर्फ मुस्तफा, करण या अन्य तीन साथीदारांसह विक्की नावाच्या तरूणावर आळीपाळीने अनैसर्गिक अत्याचार केल्याचे पोलीस तपासात उघड झालेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.