www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या पायधुनीमधील ‘रिलॅक्स गेस्ट हाऊस’मधून दोन संशयीत अतिरेक्यांना क्राईम ब्रान्चनं अटक केलीय. हे दोन्ही दहशतवादी हिजबूल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंधित असल्याचं पुढं आलंय.
फारुख नायकू आणि मोहमद मोहम्मद तालुकदार अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. क्राईम ब्रांन्चनं त्यांना १६ जानेवारी रोजी एका गेस्ट हाऊसमधून ताब्यात घेतलं होतं. फारुख नायकूनं आपण काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये सक्रीय असणार्याऊ हिजबूल मुजाहिद्दीनचा सक्रिय कार्यकर्ता असल्याचं कबूल केलंय. भारतातली अनेक महत्त्वांच्या आणि सुरक्षेच्या दृष्टिनं महत्त्वाच्या असणाऱ्या स्थळांची माहिती पाकिस्तानला तो पुरवत होता, अशी माहिती मुंबई क्राईम ब्रान्चचे जॉईन्ट सीपी हिमांशु रॉय यांनी दिलीय.
२००१ पासून नाईकू हिजबूल मुजाहीद्दिनशी संपर्कात होता. अनेक वेळा तो पाकिस्तानला गेला आहे. तिथल्या हिजबूलच्या कमांडरलाही तो भेटला होता. पाकिस्तान आर्मी आणि हिजबूल मुझाहिद्दीन यांच्याशी तो ई-मेलद्वारे संपर्कात असल्याची माहिती मिळतेय. फारुख आणि तालुकदार या दोघांना २३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.