मुंबई : माफियांचा अड्डा उद्ध्वस्त करू असं वादग्रस्त विधान करुन शिवसेनेला डिवचणाऱ्या भाजप खासदार किरीट सोमय्यांच्या आरोपकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दुर्लक्ष केलंय.
सोमय्यांनी केलेल्या आरोपांना शिवसैनिकच उत्तर देतील असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. सोमय्यांच्या त्यांच्या आरोपांचा विषय माझ्यापर्यंत आलेला नाही असं म्हणत त्याला फार महत्व देत नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
आज मातोश्रीवर झालेल्या काही पक्ष प्रवेशांच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांनी हे विधान केलं आहे.