भाजीपाला, कांद्यानंतर डाळीच्या दरात ३० ते ४० टक्यांपर्यंत वाढ

पावसाने दडी मारल्याने याचा चांगलाच फटका जीवनावश्यक वस्तूंवर बसल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम भाजीपाला, कांदा आणि आता डाळीच्या उत्पादनावर झाला आहे. उत्पादन घटल्याने डाळीच्या दरात ३० ते ४० टक्यांपर्यंत वाढ झाली आहे. 

Updated: Aug 21, 2015, 04:02 PM IST
भाजीपाला, कांद्यानंतर डाळीच्या दरात ३० ते ४० टक्यांपर्यंत वाढ  title=

मुंबई : पावसाने दडी मारल्याने याचा चांगलाच फटका जीवनावश्यक वस्तूंवर बसल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम भाजीपाला, कांदा आणि आता डाळीच्या उत्पादनावर झाला आहे. उत्पादन घटल्याने डाळीच्या दरात ३० ते ४० टक्यांपर्यंत वाढ झाली आहे. 

रोजच्या जेवणात हमकास असणारी डाळ ही १४० ते १५० रूपयांवर गेली आहे. घाऊक मार्केटला  ८० ते ९० रूपयांपर्यंत मिळणा-या तूरडाळीने शंभरी पार करीत दीडशेचा आकड़ा गाठला आहे. 

होलसेल मार्केटमध्ये १३० ते १४० रूपयांना मिळणारी तुरडाळ ही किरकोळ मार्केटला १५० रूपयांना विकली जात आहे. तूरडाळी च्या किमतीत ३० ते ४० टक्यांनी वाढ झाली आहे.डाळींचे भाव हे अचानक कडाडल्याने महिन्याच बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

डाळींचे भाव किती आहेत
डाळ         आताचे दर             पूर्वीचे दर
तुरडाळ-     १३५                      १००
चणाडाळ-    ६१                        ५५
उडिद-         ११७                     १०१
मसूर-          ८५                       ८०

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.