मी नाही, राष्ट्रवादीनं मला सोडलं – गावित

राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदूरबारमधले बंडखोर नेते डॉ. विजयकुमार गावित यांनी आज मुंबईत अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केलाय.

Updated: Sep 6, 2014, 10:46 PM IST
मी नाही, राष्ट्रवादीनं मला सोडलं – गावित title=
फाईल फोटो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदूरबारमधले बंडखोर नेते डॉ. विजयकुमार गावित यांनी आज मुंबईत अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केलाय.

विरोध पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत गावितांचा भाजप प्रवेश झाला. ‘आपण राष्ट्रवादी सोडली नसून राष्ट्रवादीनं आपल्याला सोडलं’ अशी प्रतिक्रिया गावितांनी यावेळी दिलीय.

काँग्रेसवाले आपल्यावर आरोप करु शकत नव्हते म्हणून ते भाजपच्या माध्यमातून आरोप होत होते, असंही गावितांनी यावेळी म्हटलंय. तर गावितांवरील आरोप सिद्ध झाले तर त्यांना एक क्षणही पक्षात ठेवणार नसल्याचं खडसेंनी सांगितलं. 

यावेळी गावित यांच्या कन्या आणि भाजपच्या खासदार हिना गावितही उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला केवळ खडसेंचीच उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.