मुंबई : नारायण राणे यांनी काल सिंधुदुर्गमधून मला आता आमदार म्हणून निवडून तर दाखवं असं आव्हान दिलंय. या बाबतीत मला सर्वसामान्य लोकांचे कार्यकर्त्यांचे फोन आले, मी राणेंचं आव्हान स्वीकारलं आहे, हा चेहरा महाराष्ट्राच्या विधानसभेत दिसणार नाही, याची काळजी महाराष्ट्राच्या जनतेनं घ्यावी, असं उत्तर दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना दिलं आहे.
केसरकर हा स्मगलरचा मुलगा होता, आमदारकीही माझ्या जीवावर मिळालीय, तिकीटासाठी माझ्या दारी यायचा अशी टीका नारायण राणे यांनी केल्यानंतर खालील मुद्यांवर दीपक केसरकर यांनी टीका केली आहे.
''हऱ्या-नाऱ्या गँगमधला नाऱ्या कोण?'', आर.आर.आबांना आवाहन
ज्या पद्धतीने राणे लोकांना बदनाम करतायत, त्या पार्श्वभूमीवर माझं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना नम्र आवाहन आहे की, चेंबूरमध्ये जी हऱ्या नाऱ्या ही कुख्यात गँग होती, त्यातील नाऱ्या कोण आहे, हे ही आजच्या तरूण पिढीसमोर आलं पाहिजे, त्या सर्व जुन्या फाईल काढून शोधून काढा, नाहीतर राजकारणामधून पैसा आणि पैशातून राजकारण यातून महाराष्ट्राची संस्कृती बिघडणार आहे.
तेव्हा कुठे मुलगा निवडला होता - केसरकर
या प्रसंगी मला आणखी एक सांगायचं आहे, ते कालपासून सातत्याने मला ते कृतघ्न म्हणतातय, त्यांचा मुलगा जेव्हा मागच्या वेळेस निवडून आला, तेव्हा मी 20 दिवस घरी गेलो नव्हतो. एवढा प्रचार केल्यानंतर तो कसा बसा 40 हजार मतांनी निवडून आला होता.
लोक राणेंबरोबर राहिलेले नाहीत - केसरकर
माझ्या मतदारसंघात मध्येच त्यांचा मुलगा 42 हजारांनी त्यांचा मुलगा मागे आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, राणे जो गमजा करतात, जो काही असेल तो असेल, राणेंबरोबर लोक राहिलेले नाहीत. कारण लोक त्यांच्याबरोबर राहिलेले नाहीत, कारण लोकांना शांतता हवी आहे. ते जे भोपळा उभा करतायत भ्रमाचा, आज त्यांचं सिंधुदुर्ग जिल्हात काहीही स्थान राहिलेलं नाही. कालपासून मी फिडबॅक घेतला आहे.
राणेंच्या स्वागतासाठी शंभर माणसं जमतात - केसरकर
मी नुसता आमदारकीचा राजीनामा दिला, सिंधुदुर्गात गेलो तरी हजारो लोकं जमतात, मात्र राणेंच्या स्वागतासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये शंभराच्या संख्येने लोकं का जमतात. याचा सुद्धा विचार केला पाहिजे, आणि राणेंसारख्या एका अनेक वर्ष राजकारणात असलेल्या माणसाला स्वत:च्या मतदार संघात सिंधुदुर्गात शेकडो गाड्या घेऊन का जावं लागतं.
असाही मंत्री होता - केसरकर
केसरकर पुढे म्हणाले, मला नवीन पिढीसमोर हे सर्व आणायचं आहे, आज मंत्र्यांवर आरोप झाले तर राजीनामा देतात, मात्र ज्या मंत्र्याला खुनाच्या केसमध्ये जबान्या द्याव्या लागत होत्या, तो त्याचवेळी मंत्रिपदावर होता. या सर्व गोष्टी मला जीव धोक्यात घालून महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणायच्या असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलंय.
भ्रष्टाचाराचं उत्कृष्ट उदाहरण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद असल्याचंही दीपक केसरकर यांनी म्हटलंय.
पाहा काय म्हणाले केसरकर
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.