मुख्यमंत्र्यांकडून 'फाम' घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

फाम हौसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अखेर चौकशीचे आदेश दिलेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी चौकशीचे आदेश दिले असून झी मिडियानं हा घोटाळा उघडकीस आणला होता. 

Updated: Jul 20, 2014, 03:31 PM IST
मुख्यमंत्र्यांकडून 'फाम' घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश title=

नवी मुंबई : फाम हौसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अखेर चौकशीचे आदेश दिलेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी चौकशीचे आदेश दिले असून झी मिडियानं हा घोटाळा उघडकीस आणला होता. 

सामान्य लोकांना पैसे भरूनही घरे मिळाली नसताना नेते, अधिकारी आणि मोठ्या व्यापा-यांनी मात्र अनेक घरे लाटली होती. व्यापा-यांकडील कर्मचा-यांना घरे मिळावीत यासाठी सिडकोनं स्वस्त दरात फाम हौसिंग सोसायटीला भूखंड दिला होता.

परंतु इथं बांधण्यात आलेले अनेक फ्लॅट्स अपात्र लाभार्थ्यांना वाटण्यात आले. उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक, जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक स्थानिक नेते, अधिका-यांनी फ्लॅट लाटल्याचा आरोप आहे. 

सोसायटीचे तत्कालीन चेअरमन मोहन गुरनानी हे या घोटाळ्याचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी तर तब्बल सतरा फ्लॅट्स लाटले आहेत. 

सहकार विभागातून आलेल्या दोघा प्रशासकांनीही या घोटाळ्यात डल्ला मारला असल्याचा आरोप आहे. या चौकशीच्या आदेशामुळं सिडको आणि सहकार विभागातील अधिकारी तसंच घोटाळेबाज नेत्यांचे धाबे दणाणलं आहे. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.