इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला अजूनही सुरुवात नाही

एकीकडे अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमीपूजन शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. तर दुसरीकडे वर्षभरापूर्वी भूमीपूजन झालेल्या इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या स्मारकाचे काम एक वर्ष होऊनही सुरू होऊ शकलेले नाही. इंदू मिलची जागा अजूनही सरकारच्या मालकीची झालेली नाही. तर दुसरीकडे इंदू मिलच्या 12 एकर जागेपैकी 40 टक्के जागा अद्याप सीआरझेड बाधीत आहे.

Updated: Dec 22, 2016, 06:07 PM IST
इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या कामाला अजूनही सुरुवात नाही title=

मुंबई : एकीकडे अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे भूमीपूजन शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. तर दुसरीकडे वर्षभरापूर्वी भूमीपूजन झालेल्या इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या स्मारकाचे काम एक वर्ष होऊनही सुरू होऊ शकलेले नाही. इंदू मिलची जागा अजूनही सरकारच्या मालकीची झालेली नाही. तर दुसरीकडे इंदू मिलच्या 12 एकर जागेपैकी 40 टक्के जागा अद्याप सीआरझेड बाधीत आहे.

टीडीआर विकून एनटीसीचे पैसे देण्यासाठी सरकारला अद्याप यश नाही आलेले नाही. जोपर्यंत जमीन सरकारच्या नावावर होत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम सुरू होऊ शकणार नाही. दुसरीकडे आता पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे भूमीपजून होत आहे. मतांच्या राजकारणासाठी कोणतीही ठोस तयारी नसताना स्मारकांचे भूमीपूजन करून राजकारण केले जाते आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.